दुःखद निधन
दत्तू महादा कांबळे एकंबा यांचे निधन
बसवकल्याण :- तालुक्यातील एकंबा गावातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दत्तू महादा कांबळे याचे आज दिनांक १९ जून रोजी पहाटे च्या सुमारास घरात झोपले असता त्यांना सर्पदंश झाला असून त्यामुळे त्याचे निधन झाले त्यासमयी ते 58 वर्षाचे होते ,ते घरातील कमावते एकमेव व्यक्ती असून, त्यांच्या निधनाने त्याची आजारी वयस्क आई व मुलगी यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तरी त्याच्या आई व मुलीला शासकीय मदतीचे अत्यंत गरज असून शासनाने दत्तू महादा कांबळे याच्या घरच्यांना त्वरित मदत करून सहकार्य करावे असे आव्हान प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष लक्ष्मण कांबळे यांनी आव्हान केले आहे,
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार हा मोजक्याच लोकांच्या उपस्थित बौद्ध स्मशान भूमी एकंबा येथे होणार असल्याचे ही भिम शक्ती तरुण मित्र मंडळाच्या कडून कळवण्यात आले आहे ,विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते ,आप्तेष्ट व गावातील मंडळींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळवले आहे

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.