आता कर्मचाऱ्यांची तक्रार करता येणार ! - SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी

 अल्ताफ शेख

 उस्मानाबाद प्रतिनिधी  * बातमी ।। *  






 *आता कर्मचाऱ्यांची तक्रार करता येणार ! - SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी - जाणून घ्या याविषयी*


  स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीप्रमाणे - बँकेच्या संकेतस्थळावर कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.


 त्यामुळे बँकेचे ग्राहकांना कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार करता येणार आहे .


 *कशी करता येणार तक्रार ?*


 SBI ने दिलेल्या माहितीनुसार - ग्राहकांना बँकेच्या कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी cms.onlinesbi.com/CMS हे पोर्टल ओपन करा 



 त्यानंतर General Banking पर्यायवर क्लिक करा - त्यानंतर Branch Related हा पर्याय निवडल्यावर यामध्ये तुमची तक्रार नोंदवता येणार आहे  *स्टेट बँक ऑफ इंडियाची* - हि सुविधा ग्राहकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या