पोलीस ठाणे विवेकानंद चौक ची कामगिरी... चोरीच्या 19 मोटरसायकलसह 1 आरोपी अटक. 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


        *पोलीस ठाणे विवेकानंद चौक ची कामगिरी... चोरीच्या 19 मोटरसायकलसह 1 आरोपी अटक. 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...*




लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

    या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मलाविषयक गुन्ह्याचे विशेषता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते.

            त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे,परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथील पोलीस निरीक्षक श्री.सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे दिनांक 28/ 03/2022 रोजी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासकामी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथक रवाना करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून इसम नामे

 अखिल महबूब शेख, वय 34 वर्षे, राहणार हबीबपुरा परळी जिल्हा बीड, सध्या राहणार शाम, नगर लातूर.

यास श्याम नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी एम. आय.टी. कॉलेज पार्किंगमध्ये लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले.

              नमूद आरोपीकडे आणखीन सखोल तपास केला असता त्यांनी लातूर शहर, उदगीर, माळाकोळी, अंबाजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर, पुणे येथील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकली पैकी 19 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

           नमूद आरोपीस पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असलेले गुन्हा रजिस्टर क्रमांक 189/ 2022 कलम 379 भादवी मध्ये दिनांक 02/04/2022 रोजी अटक करण्यात आली आहे. 

             सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक व उपविभाग लातूर शहर येथील विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलिस उपनिरीक्षक महेश गलगट्टे, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मानूला, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर,  सहायक फौजदार बुड्डे पाटील, वाहिद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार मुन्ना पठाण, संजय कांबळे ,रामलिंग शिंदे ,दयानंद सारोळे, महेश पारडे, विनोद चलवाड, खंडू कलकत्ते, रमेश नामदास यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या