मुक्तेश्वरच्या अनुराग सावंत यांची योगा स्पर्धेत राज्यस्तरावर निवड ................
.....................................
क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , उस्मानाबाद व जिल्हा क्रीडा परिषद उस्मानाबाद द्वारा आयोजित "विभाग स्तर शालेय योगासन क्रीडा स्पर्धा "
सन 2022 - 23
स्थळ : - श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय , तुळजापूर
आज विभाग स्तरावरील योगासने स्पर्धा उत्साहात पार पडल्या. त्यात मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा येथील इयत्ता सातवीतील "ड" मधील विद्यार्थी चि. अनुराग नेताजी सावंत यांनी 14 वर्षे वयोगटातून विभागातून प्रथम येऊन राज्यस्तरावर आपली निवड सिद्ध केलेली आहे. त्यांना योग प्रशिक्षक म्हणून त्यांचे क्रीडा शिक्षक श्री रड्डे बस्वराज ,मंडले अंकूश , आशा झुंजे - पाटील , अजित ढोले व त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले.
अनुराग सावंत यांनी चित्त थरारक योगासने करून विभागातील सर्व स्पर्धकावर मात करून विभागातून प्रथम येण्याचा मान पटकावला व त्यांची राज्यस्तरावर निवड सिद्ध झालेली आहे. यामुळे मुक्तेश्वर शाळेच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शिवलिंगअप्पा औटी ,सचिव श्री बस्वराज पटणे , संस्थेचे सर्वेसर्वा रविअप्पाराचट्टे , प्रभूअप्पा माशाळे संस्थेचे सर्व पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक श्री जलसकरे शरणाप्पा , उपमुख्याध्यापक योगेश पकाले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीअनुराग सावंत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.
पहिल्याच प्रयत्नात , लहान वयात योगा स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सर्वत्र अनुराग सावंत यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.