पत्रकार सलाऊद्दीन शेख यांच्या पत्रकारितेच्या अनुभवाचा पक्षबांधणी आणि जनतेच्या हितासाठी होईल उपयोग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “ पत्रकार सलाऊद्दीन शेख यांच्या माध्यमातून पक्षाला पत्रकारांच्या आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत नवा दृष्टीकोन मिळेल. त्यांच्या पत्रकारितेच्या अनुभवाचा उपयोग पक्षबांधणीसाठी आणि जनतेच्या हितासाठी होणार आहे.” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलाउद्दीन शेख यांचं पक्षात स्वागत करताना व्यक्त केला. त्यांच्या अनुभवाचे आणि सामाजिक योगदानाचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी मुक्त कंठाने कौतुक केले.
महाराष्ट्रातील धडाडीचे आणि अभ्यासू पत्रकार अशी ख्याती असलेले ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच एनडीटीव्ही व एएनआय चे प्रतिनिधी सलाउद्दीन शेख यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात अनेक पत्रकार बांधव आणि समर्थक कार्यकर्त्यांच्या साक्षीने पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सलाउद्दीन शेख हे गेल्या 18 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सामान्यांच्या प्रश्नांबरोबरच पत्रकारांचे प्रश्न-अडचणी आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
त्यांच्या नेतृत्वात पत्रकार संघटनेने लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सातारा, सोलापूर आणि मुंबई अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
या प्रवेश सोहळ्याला लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड, औरंगाबाद, पुणे, सातारा, सोलापूर आणि मुंबई येथून आलेले अनेक कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी शिवसेनेमध्ये सामील होत पक्षाच्या ध्येय-धोरणांना पाठिंबा दर्शविला.
“ मी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाशी जोडला गेलो आहे. आता शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी काहीतरी करता येईल, याची मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी गौरवाचे आहे.” असं प्रतिपादन पत्रकार सलाऊद्दीन शेख यांनी शिवसेना पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.
आजमितीपर्यंत अल्पसंख्याकांच्या वापर विविध सत्ताधाऱ्यांनी सत्ता प्राप्तीसाठी केला असून अल्पसंख्यांक समाज आजही विकास आणि उन्नतीपासून कोसो दूर आहे. शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम अल्पसंख्याकांना आर्थिक, शैक्षणिक व धोरणात्मक निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून अल्पसंख्याकांचा विविध प्रश्न मार्गी लावण्याचा शब्दही सलाउद्दीन शेख यांनी यावेळी दिला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर, शेख यांना शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक कामात विशेष जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असल्यामुळे त्यांचं पक्षासाठी योगदान मोलाचे ठरणार आहे.
... महाराष्ट्र का शेर एकनाथ शिंदे... !
''जिसके दिल में है, बालासाहेब के विचार ...उनका नाम है महाराष्ट्र का शेर एकनाथ शिंदे... !
शिवसैनिकांच्या अशा गगनभेदी घोषणाबाजीत संपूर्ण परिसर शिवमय झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.