शेतकर्यांनी दूध संकलन बंद ठेवून शासनाचा निषेध
करण्यासाठी रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.30/07/2020
कोरोनाच्या संकटात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून या दूध उत्पादक शेतकर्यांच्या न्याय-हक्कासाठी 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. भाजपा महायुतीच्यावतीने गावा-गावातील दूध संकलन केंद्र बंद ठेवून शासनाचा निषेध व्यक्त करावा आणि बाभळगाव येथील रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्य शेतकर्यांना काहीच मदत केली नाही. परिणामी दूध उत्पादक शेतकर्यांसह सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. सध्याच्या परिस्थितीत दुधाचे दर खालावले असून दूध उत्पादक शेतकर्यांच्या न्याय-हक्कासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून 1 ऑगस्ट 2020 रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता भाजपा, रिपाई(आठवले गट), रासप, शिवसंग्राम रयतक्रांती या महायुतीच्यावतीने बाभळगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये दूधाला वाढीव दर देण्यात यावा तसेच दूध भूकटीला प्रतीकिलो 50 रूपयांचे अनुदान मिळावे आणि गायीच्या दूधाचा खरेदी दर प्रती लिटर 30 रू करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे लातूर शहर मतदार संघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दूध उत्पादक शेतकर्यांनी या रास्तारोको आंदोलनाला सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
------------------------------ -------------

------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.