*अरे लाज वाटू द्या, विज बिलला सवलत काय देताय, सरसकट माफ करा.:- डॉ राजन माकणीकर*
*मुंबई दि (प्रतिनिधी) राज्यातील काही भागात अतिवृष्टी तर पुरसदृश्य परिस्तिथीत नागरिकांचे होत्या चे नव्हते झाले आहे अश्यात सरकारने वीजबिल व शेतकऱ्यांनी घेतलेले माफ करावेत असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.*
अतिवृष्टी मुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून सत्ताधाऱ्यांनी तुटपुंजी मदत घोषित केली आहे, सत्ताधारी मंत्री महोदय विजबिला साठी परिस्तिथी सुरळीत होईपर्यंत बिल भरण्यासाठी सवलत देत आहेत ही फार लाजिरवाणी बाब आहे.
सत्ताधाऱ्यांना लाजा वाटायला पाहिजेत वीजबिल भरण्यास सवलत देण्याऐवजी सरसकट वीजबिल माफ करावेत शिवाय कोरोनामुळे अनेकांना विजबिल भरण्याचा तगादा लावला जातोय तर अनेकांची वीज कनेक्शन खंडित केली जात आहेत.
भारतीय संविधान अश्या पिडीताच्या मदतीला खंबीर पणे उभारण्याचे आदेश देत असूनही सत्ताधारी गोर गरिबांच्या मदतीला संविधानिक हक्काप्रमाणे उभारत नाहीत. निवडणुकीत या गोष्टीचा वचपा पीडित जरूर काढतील असा मनोदय ही विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.
सरकरच्या या धोरणांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक जाहीर शब्दात निषेध व्यक्त करत असून सारकरड वेळीच वीजबिल सरसकट माफ केली नाहीत तर रिपाई डेमोक्रेटिक रस्त्यावर उतरेल असा सज्जड दमही पँथर डॉ राजन माकणीकर यांनी सरकारला दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.