माळी महासंघ शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी एन जी माळी
औसा प्रतिनिधी
अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या लातूर जिल्हा शिक्षक आघाडी पदी औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रयोगशील शिक्षक नागोराव गणपतराव माळी यांची निवड झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर लिंगे, प्रदेश अध्यक्ष गौतम क्षीरसागर, आणि शिक्षक आघाडीचे आकाश मौर्य मेहेत्रे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांना संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .नागोराव माळी यांच्या नियुक्ती बद्दल अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तसेच समता परिषदेचे मकरंद सावे किशनराव फुलमाळी गुरुजी बालाजी फुले, सुधाकर मेत्रे, नारायणराव माळी ,किशन कोलते, दादा कोपरे, राम कांबळे, शिवसेनेचे सुरेश दादा भुरे आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.