धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी* *पायाभूत सुविधा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी* *पायाभूत सुविधा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन





लातूर, दि. 02  : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित अथवा विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका तथा नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना 2023-24 मध्ये राबविण्यात येत आहे. यासाठी 15 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 7 ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविण्याबाबत अल्पसंख्याक विकास विभागाच्या 25 डिसेंबर, 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संस्थाचालकांनी 7 ऑक्टोबर, 2015 च्या निर्णयाप्रमाणे विहीत नमुन्यात रितसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयात 15 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत, मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. रेड्डी यांनी कळविले आहे.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या